BHASTES JASHI Lyrics In Marathi Urvi Singh, Ajaj Ahamad

टिप्स मराठी प्रस्तूत "भासतेस जशी" हे एक सुंदर प्रेमगीत आहे. या गितामद्धे प्रेमीकेला आयुष्यातील गोड प्रसंग आणि निसर्गातील सुंदर गोष्टींची उपमा देण्यात आली आहे. हे गित प्रशांत तिडके यांच्या लेखणीतून अवतरले असून केवल वाळंज यांनी स्वरबद्ध केले आहे. अमोल दाते -नितीन कुटे या जोडीने संगीत बद्ध केलेले हे गित अलौकिक अनुभूती देणारे आहे.

BHASTES JASHI | Urvi Singh, Ajaj Ahamad | Keval Walanj | Amol-Nitin | New Marathi Romantic Song 2021


Song Credits: 
Singer: Keval Walanj & Nitin Kute
Music: Nitin Kute-Amol Date
Lyrics: Prashant Tidke


BHASTES JASHI  Lyrics In Marathi

उन्हा मधली सर ओली
परदेशात माय बोली
भासते जशी
तू भासतेस तशी

काठावरची अधीर लाट
गावाकडची पायवाट
भासते जशी
तू भासतेस तशी

हो भास् हा तुझा 
होतो रोज मजला का
ही आस का तुझी 
लागे रोज़ या जीवा
ध्यास लागला 
तुझा आहे होण्याचा
सहवास हा तुझा
वाटे का हवा हवा

हृदया मधली ती आरोळी
आनंदाची एक टाळी
मंद झुळूक ती सांजवेली
भासते जशी
तू भासतेस तशी

भर रातीला रातरानी
पुराणातली गोड कहानी
भासते जशी
तू भासतेस तशी

हो रोज रातिच्या 
स्वप्नामधे तुला बघतो
तुझ्या मनातले वाचावे कैसे
मी रोज़ शिकतो
मी राजा जर तरची राणी
सुरुवात अन अंत दोन्ही
भासतात जशी
तू भासतेस तशी  

भासतात जशी
तू भासतेस तशी 
भासतात जशी
तू भासतेस तशी 




Post a Comment

0 Comments